Nashik : उड्डाणपुलाच्या उद्घाटन कार्यक्रमावरुन मविआ नेत्यांमध्ये नाराजी नाट्य, छगन भुजबळ नाराज

काल नाशिकमध्ये जत्रा हॉटेल ते केके वाघ कॉलेजपर्यंतच्या उड्डाणपुलाचं काल उद्घाटन करण्यात आलं होतं. मात्र आता या उद्घटानावरून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांमधील नाराजी नाट्य समोल आलंय. काल शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचं उद्घाटन झालं मात्र त्या कार्यक्रमाला पालकमंत्री छगन भुजबळ नाशकात असतानाही त्यांना निमंत्रण नसल्यानं भूुजबळ नाराज असल्याचं कळतयं. हा कार्यक्रम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत व्हायला हवा होता. किंवा आज मुख्यमंत्री नाशकात आहेत. त्यांच्या हस्तेही उद्घाटन झालं असतं असं नाराजीयुक्त वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलयं. आश्चर्याची बाब म्हणजे या पुलाचं बांधकाम अद्याप अपूर्ण असल्याचं कळतंय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola