Nashik Bandhara : नाशिकच्या मोहपाडा येथील वनविभागाने बांधलेला बंधारा फुटला
नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील मोहपाडा इथं वनविभागाने बांधलेला मातीचा बंधारा फुटलाय. त्यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय.वनविभागाने मागील वर्षी या मातीच्या बंधाऱ्याचे काम केले होते. हे काम निकृष्ट झाल्याने बंधारा फुटला, त्यामुळं शेतकऱ्यांचं आणि रस्त्याचं नुकसान झालंय. वनविभागाने या बंधाऱ्याचं पुन्हा बांधकाम करण्याची आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागलीय. तसंच उंबरपाडा येथील रस्त्यावरील मोरी पूल पुरात वाहून गेल्याने मोठे खड्डे पडले. उंबरपाडा येथीलच भारत निर्माण योजनेची पाइपलाइनही पुरात वाहून गेली आहे.
Tags :
Pipeline Forest Department Farmers Compensation Poor Construction | Nashik Surgana Nashik Road Damage Mohpada Earthen Embankment Major Crop Damage