Nashik Autocop | नऊ महिन्यांपासून पगार नाही? नाशिकच्या ऑटोकॉप कंपनीच्या कामगारांचं आंदोलन
ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या अंबड परिसरातील ऑटोकॉप कंपनीने तब्बल गेल्या 9 महिन्यांपासून पगार न दिल्याचा गंभीर आरोप कामगारांकडून केला जातोय. कार सेंट्रल लॉक सिस्टीम तसेच ऑटोमोबाईल क्षेत्राशी संबंधित तर उत्पादने ऑटोकॉप या कंपनीत घेतले जातात, जवळपास 150 कामगार या कंपनीत कार्यरत आहेत. कोरोना सारख्या महासंकटातही हे कामगार काम करत राबतायत मात्र त्यांना या कामाचा मोबदला दिला जात नसल्याचा आरोप करण्यात येत असून यामुळे सध्या मोठ्या अडचणींचा सामना त्यांना करावा लागतोय.