Nashik | नाशिकच्या लासलगावमध्ये जळीतकांड, महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न | ABP Majha

वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये शिक्षिकेला जाळून तिची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना नाशिक जिल्ह्यातही अशीच घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगावमध्ये बसस्थानकाजवळ शनिवारी संध्याकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी मुख्य संशयित अद्याप फरार असून दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola