Asaram Bapu | नाशिक मनपा शाळेत आसाराम बापूची पत्रक
बलात्कारी आसारामची पत्रकं सातपूरच्या मनपा शाळेत वाटण्यात आली आहेत. गंभीर बाब म्हणजे शिक्षकांनी शिकवणं सोडून आश्रमातून आलेली ही पत्रकं वाटली. त्यामुळे बलात्कार प्रकरणात जो दोषी आहे, तुरूंगाची हवा खातोय, अशा व्यक्तिची पत्रकं शाळेत का वाटावी, असा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान या प्रकाराची दखल महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घेतलीय