Nashik APMC Elections : कळवणमध्ये राष्ट्रवादीच्या पॅनलने 18 पैकी 15 जागांवर मिळवला विजय

Nashik APMC Elections : कळवणमध्ये राष्ट्रवादीच्या पॅनलने 18 पैकी 15 जागांवर मिळवला विजय

नाशिकच्या कळवण बाजार समितीवर आमदार नितीन पवार , माजी सभापती धनंजय पवार यांच्या शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १५ जागांवर विजय मिळवित निर्विवाद वर्चस्व मिळविले. कळवण मध्ये महाविकास आघाडी एकत्र येत सर्व समावेश पॅनलची निर्मिती केली होती..दरम्यान, माजी आमदार जे.पी.गावित यांनी परिवर्तन पॅनलला जाहीर पाठींबा दिला होता.मात्र परिवर्तन पॅनलचे  रविंद देवरे यांना केवळ ३ जागावर समाधान मानावे लागले आहे..बाजार समिती निकाल जाहीर होताच शेतकरी विकास पॅनलच्या कार्यकर्त्यानी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत एकच  जल्लोष केला.यावेळी कार्यकर्त्यानी जोरदार घोषणाबाजी केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola