Nashik Accident CCTV : टायर फुटला, गाडी उलटली, दुचाकींना धडकी; विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू
नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावर कारचे टायर फुटून झालेल्या एका विचित्र अपघातात दोन तरुणांचा नाहक बळी गेला आहे. हॉटेल संस्कृती समोर सोमवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास त्र्यंबकेश्वरहून नाशिककडे भरधाव वेगात येणाऱ्या होंडा सिटी कारचे अचानक टायर फुटल्याने कारने पलटी घेतली आणि दुसऱ्या लेनवर समोरून येणाऱ्या दोन दुचाकींना जाऊन ति धडकली. अपघाताची ही थरारक घटना हॉटेलच्याच सिसिटीव्ही कॅमेरात कैद झाली असून यात हॉटेल बाहेरच रोडच्या कडेला उभी असलेली एक व्यक्ती थोडक्यात बचावल्याचंही बघायला मिळते आहे. नामदेव विठ्ठल शिंदे आणि सुनील मनोहर महाले या दुचाकी चालकांचा यात मृत्यू झाला असून सुनील महाले हा स्वराज्य संघटनेचा पदाधिकारी होता अशी प्राथमिक माहिती आहे तर होंडा सिटी कार मधील सर्व प्रवासी हे सुखरूप आहेत. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती, सातपूर पोलीसांकडून अपघाताचा अधिक तपास सध्या केला जातोय.