Nashik | नाशिकमध्ये बस आणि रिक्षाच्या अपघातात 25 जणांचा मृत्यू | ABP Majha
नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील मेशी फाट्यावर धोबी घाट परिसरात झालेल्या बस आणि रिक्षा अपघातातील मृतांचा आकडा 25 वर गेला आहे तर 33 जण जखमी आहेत. मध्यरात्री 2 वाजेपर्यंत विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू होतं. अपघातातील जखमींवर सध्या मालेगावातील जिल्हा रुग्णालयासह इतर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.