Nashik Unseasonal Rain : नाशिकच्या 11 तालुक्यात अवकाळी पावसाचं थैमान, 268 हेक्टरवरील पिकांचं नुकसान
abp majha web team
Updated at:
12 Apr 2023 01:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे बळीराजावर संकटाचं आभाळ कोसळलंय... नाशकातील ११ तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्यासह इतर पिकं पाण्याखाली गेली आहेत... उन्हाळी कांद्याला दर मिळण्याची अपेक्षा असताना अवकाळी पावसाने कांद्याचा अक्षरश: चिखल झालाय... शेळ्या मेंढ्यांना पाण्यात भिजलेला कांदा खाऊ घालण्याची वेळी शेतकऱ्यांवर आलीये... रात्रंदिवस कष्ट करुन उभं केलेलं पीक नजरेसमोर जमीनदोस्त झाल्याने बळीराजाला अश्रू अनावर झालेत... हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला असून मायबाप सरकारने मदत करावी अशी आर्त साद शेतकऱ्यांनी घातलीये..