Nashik : नाशिकमध्ये 5 वर्षांत 10 हजारांवर घटस्फोट; व्हॉट्सअॅप, सोशल मीडियातील वादामुळे संसार मोडले
Continues below advertisement
नाशिकमध्ये गेल्या पाच वर्षांतील घटस्फोटाची वाढती संख्या समोर आलीय. गेल्या पाच वर्षांत नाशिक शहरात तब्बल १० हजारावर जोडप्यांचे घटस्फोट झालेत. व्हॉट्सअॅपसह सोशल मीडियामुळे होणारे वाद आणि त्यातून वाढत जाणारी भांडणं, कोरोना काळातील आर्थिक आणि कौटुंबीक वाद ही या घटस्फोटांचं प्रमुख कारणं बनली आहेत. २०१८ पासून आतापर्यंत निकाली निघालेल्या दाव्यांत तब्बल १० हजारांवर प्रकरणांत घटस्फोट झालेत, तर केवळ १ हजार ९७४ प्रकरणांत जोडीदारांची मनं जुळली आहेत. घटस्फोटाच्या तुलनेत मनं जुळण्याचं प्रमाण कमी असून रोज १३ ते १४ जोडपी घटस्फोटासाठी न्यायालयात दावे दाखल करत असल्याचं चिंताजनक वास्तव समोर आलंय.
Continues below advertisement