Maratha Reservation Protest : खासदार संभाजीराजेंच्या उपस्थितीत आज नाशिकमध्ये मूक आंदोलन
मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा
Updated at:
21 Jun 2021 10:34 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशकात आज होणाऱ्या मराठा मूक आंदोलनासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 20 अधिकारी आणि 150 कर्मचारी आंदोलनस्थळी तैनात असून आंदोलनावर नजर ठेवणार आहेत. थोड्याच वेळात खासदार संभाजीराजे छत्रपती आंदोलनस्थळी पोहोचणार आहेत. ज्या ठिकाणी आंदोलन पार पडणार आहे तिथे प्रवेशद्वारावरच बैरिकेटींग करण्यात आले असून येणाऱ्या आन्दोलकांची तपासणी केली जात आहे. आंदोलन मूक असल्यानं कोणीही घोषणाबाजी करू नये आशा स्पष्ट सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. आंदोलना नंतर समन्वयक बैठक घेतली जाणार आहे.