Lockdown 4.0 | कामधंदा नसल्याने नाशिकमधून हजारो कामगारांचं स्थलांतर

पोटाची खळगी भरण्यासाठी परराज्यातून आलेले कामगार लॉकडाऊनमुळं पुन्हा गावची वाट धरत आहेत. त्यामुळं कंपन्या ओस पडताना दिसत आहेत. नाशिक जिल्ह्यातून कामधंदा नसल्यानं हजारो मजूर गावी परतले आहेत. याचा फटका औद्योगिक वसाहतींना बसतोय. शिवाय गावंही ओस पडू लागली आहेत. सिन्नर तालुक्याच्या माळेगाव, मुसळगाव एमआयडीतील हजारो कामगार गेल्यानं गावातील घरांना कुलुप लागलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola