Mumbai Nashik महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, खारीगाव-राजनोली टोलनाक्यादरम्यान कोंडी ABP Majha
Continues below advertisement
Mumbai ते नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. या मार्गावर 10 ते 15 किलोमीटरपर्यंत लांबच रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना गेल्या 3 तासापासून वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने त्यातून गाडी चालवणं प्रवाशाना कठिण होऊन बसलं आहे. त्यामुळेच या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. एमएमआरडीए प्रशासनाने हा रस्ता बांधला आहे. या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने त्याचा वाहनधारकांना मोठा फटका बसला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement