Igatpuri Rave Party : इगतपुरीतील रेव्ह पार्टीचा पर्दाफाश, मराठी बिग बॉस फेम हिना पांचाळसह 25 अटकेत
नाशिक : मराठी बिग बॉसची माजी स्पर्धक आणि अभिनेत्री हिना पांचाळच्या अडचणीत वाढ झाली आहे. नाशिकच्या इगतपुरीमध्ये पोलिसांनी हायप्रोफाईल रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला. या रेव्ह पार्टीमधून पोलिसांनी हिना पांचाळसह 22 जणांना अटक केली आहे. यात परदेशी महिलेसह बारा महिला आणि दहा पुरुषांचा समावेश आहे. या सगळ्यांच्या रक्ताचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर कोणी ड्रग्स आणि इतर पदार्थांचं सेवन केलं होतं ते स्पष्ट होईल.