Malegaon Crime : पैसे लाटण्यासाठी विवाह, लाखो रुपये लंपास; फसवणूक करणारी महिला पोलिसांच्या ताब्यात

Continues below advertisement

लग्न म्हणजे एक पवित्र सोहळा. दोन जीवांचे मिलन आणि दोघांनी मिळून संसार थाटण्याचा निर्धार. एका महिलेनं मात्र या पवित्र सोहळ्याचा गैरवापर करत लाखो रुपये लाटले. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील ' दाभाडी ' गावच्या एका उपवरासोबत अडीच लाख रुपये घेऊन विवाह केला. त्यानंतर काही दिवसांत 58 हजारांचे सोन्याचे दागिने आणि 10 हजारांची रोख रक्कम घेऊन ती पसार झाली. काही दिवसांनी हीच महिला मालेगावच्या दसाने गावात दुसऱ्या उपवरासोबत बोहल्यावर उभी राहणार होती. याची माहिती पहिल्या उपवराला मिळाली, त्यानं थेट पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू करून या महिलेला ताब्यात घेतलं. तिचे कथित लग्न जमवून देणाऱ्या नाशिक, कोपरगाव येथील दोन महिला आणि काही पुरुष नातेवाईकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांचा शोध सध्या सुरू आहे. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram