Nashik Fire : जिंदाल कंपनीत मोठी आग, पोलीस अधीक्षक घटनास्थळी परिस्थितीवर लक्ष ठेवून
Continues below advertisement
नाशिकच्या इगतपुरीतल्या मुंढेगाव जवळील जिंदाल कंपनीत मोठी आग लागली आहे.. या भीषण आगीत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास लागलेली आग पाच तासांनंतरही धुमसतीच आहे.. कंपनीतून स्फोटांचे आवाज येत असून, अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय लष्कराची तुकडीही घटनास्थळी पोहोचलीय. त्याप्रमाणे, बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार आणि स्थानिक आमदारांनी परिस्थितीचा आढावा घेतलाय. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकही घटनास्थळी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
Continues below advertisement
Tags :
Death FIRE | Nashik Mundhegaon Nashik Igatpurit Jindal Co. In Severe Fire Critical Condition Helicopter Help