Cold wave in Maharashtra | महाराष्ट्र गारठला; थंडीच्या लाटेवर नाशिकरांच्या प्रतिक्रिया
Continues below advertisement
देशात मागील बऱ्याच दिवसांपासून तापमानात लक्षणीय घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्यातही बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा खाली आल्याचं लक्षात येत आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर भागांमध्ये मोठ्या प्रमाणात शीतलहर आल्यामुळं इथं महाराष्ट्रही गारठला आहे.
गेल्या दोन दिवसांत ग्रामीण भागात हाडं गोठवणारी थंडी पडली आहे. परभणीमध्ये 5.6 अंश सेल्शिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. हे तापमान सध्यापर्यंत यंदाच्या हिवाळ्यातील सर्वाधित निचांकी आकडा दर्शवत आहे. यासोबतच बुलढाण्यातही तापमानाचाप पारा 9 अंशांवर पोहोचला. पश्चिम महाराष्ट्रात महाबळेश्वरमध्ये तापमान 11 अंशांवर आलं आहे. त्यामुळं या कडाक्याच्या थंडीमुळं आता अनेक भागांमध्ये चौक आणि गल्लीबोळांच्या कोपऱ्यांवर शेकोट्याही दिसू लागल्या आहेत.
Continues below advertisement