Nashik Temperature | राज्यात गारठा वाढला; नाशिकमध्ये पारा 12 अंशांवर
नोव्हेबर महिन्याची सुरुवात होताच नाशिकमध्ये किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. आज पारा 12 अंशांपर्यंत येऊन पोहोचलाय आणि याच थंडीचा आनंद लूटण्यासाठी नाशिककर जॉगिंग ट्रेकवर दाखल होत असून लॉकडाऊनमध्ये सूने पडलेले जॉगिंग ट्रेक आज जॉगर्सच्या गर्दीने फुलून गेले आहेत. शिवाय व्यायाम करत आरोग्याची काळजी घेतानाही नागरिक बघायला मिळतायत. गोल्फ क्लबवर 72 वर्षीय निवृत्त लष्करी अधिकारी अशोक राणा यांचा उत्साह हा तरुणांनाही लाजवेल असा असून प्रत्येकाने रोज सकाळी वॉक करा आरोग्य उत्तम राहिल असा सल्ला ते इथे येणाऱ्या प्रत्येकाला देतात.