Nashik : पाऊस लांबल्याने आवक घटली, भाज्यांचे दर 50 टक्क्यांनी कडाडले
पावसाने ओढ दिलीय, उन्हाचे चटके असह्य झालेत... मात्र, उन्हाने बाहेर वाढलेलं तापमान आता स्वयंपाकघरापर्यंत पोहोचलंय. कारण आहे, भाज्यांचे दर... मेथी, शेपू तसेच पालक या पालेभाज्यांचे दर तब्बल ५० टक्क्यांनी वाढलेत. कोथिंबिरीच्या दरातही ५० टक्क्यांची वाढ झालीय. दरम्यान, भाज्यांची आवक कमी झाल्याने हे दर कडाडल्याचं बोललं जातंय.