Maharashtra Farmers : खरीप हंगामाला सुरुवात, मात्र रब्बी हंगामातील नुकसान भरपाई अद्याप नाही

Continues below advertisement

उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आजही अवकाळी पावसाने झालेल्या नुकसान भरपाईची प्रतीक्षा आहे. यंदा मार्च-एप्रिलमध्ये नाशिक जिल्ह्यातील 82 हजारांहून अधिक शेतकऱ्यांचं 45 हजार हेक्टरवरील शेतपिकांचं नुकसान झालं. तर उत्तर महाराष्ट्रातील बाधित शेतकऱ्यांचा आकडा दीड लाखावर आहे. हे शेतकरी आजही मदतीपासून वंचित आहेत. आता खरीप हंगामाला सुरुवात होतेय, तरीही रब्बी हंगामातील नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत.

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram