Laser Lights Side Effects on Eye : लेझर लाईट्स डोळ्यांसाठी का घातक आहेत?

Continues below advertisement

गणपती विसर्जन मिरवणुकीतील लेझर लाईटमुळे अनेकांची दृष्टी जात असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. आता नाशिकमध्ये तशी उदाहरणंच हळूहळू समोर येऊ लागली आहे. या लेझर लाईट्समुळे नागरिकांच्या डोळ्यावर गंभीर परिणाम झाल्याचं नेत्ररोग तज्ज्ञांच्या तपासणीत समोर आलंय. नाशिकमध्ये गेल्या तीन दिवसात अशा सहा घटना समोर आल्या आहेत. लेझर लाईट्समुळे रुग्णांच्या नेत्रपटलावर भाजल्यासारख्या जखमा आढळल्या. अशा घातक लेझरमुळे दृष्टी कायमस्वरुपी देखील जाऊ शकते अशी भीती नाशिक नेत्ररोग तज्ञ असोसिएशनने व्यक्त केलीय. दरम्यान हे लेझर लाईट्स किती धोकादायक आहेत? रुग्णांच्या डोळ्यावर याचा नक्की कसा परिणाम होतोय? या आणि इतर विषयावर डॉक्टरांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram