Lasalgaon Onion Market : कांदा लिलावात सहभागी व्हा; अन्यथा परवाने रद्द, जिल्हा निबंधकांचा इशारा

Continues below advertisement

Lasalgaon Onion Market : कांदा लिलावात सहभागी व्हा; अन्यथा परवाने रद्द, जिल्हा निबंधकांचा इशारा लेव्ही प्रश्नांवरून माथाडी मंडळ व व्यापारी यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह १५ बाजार समित्यांमधील कांद्यासह शेतमाल लिलाव प्रक्रिया मागील आठ दिवसांपासून बंद आहे..या वादामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे..या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, माथाडी मंडळ व व्यापारी यांच्यात लेव्ही प्रश्नांसंदर्भात  दोन ते तीन बैठका झाल्या मात्र व्यापारी व माथाडी मंडळ आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने तोडगा निघाला नाही..परिणामी बाजार समित्या आजही बंदच आहे..दरम्यान, जिल्हा निबंधकांनी व्यापारी लिलावात सहभागी होत नसतील तर त्यांचे परवाने रद्द करा, बाजार समित्यांनी व्यापाऱ्यांनी दिलेल्या सुविधा बंद करा असे आदेश दिल्याने काल लासलगाव येथील संचालक मंडळाच्या बैठकीत लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव आजपासून सुरू करण्यात येणार आहे..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram