Lasalgaon : लासलगावात तीन दिवसांनी कांदा लिलावाला सुरुवात, शेतकरी-व्यापाऱ्यांचं मनात काय?
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये आज तब्बल तीन दिवसांनी कांद्याचे लिलाव सुरू झाले. मात्र दोेनच तासांत लासलगाव आणि पिंपळगाव बाजार समित्यांमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. कांद्याला योग्य भाव मिळत नाहीये, नाफेडचे अधिकारी देखील उपस्थित नाहीत, अशी तक्रार कांदा उत्पादक शेतकरी करतायत.