Manmad Crop : खरिपाची पिके करपू लागली ; हंगाम वाया जाण्याची शक्यता

पावसाने ओढ दिल्यामुळे खरीपाची पिके करपू लागलीत. त्यामुळे हंगाम वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकरी हवालदिल झालाय. मनमाडमध्ये अडीच महिन्यांपासून पाऊस लांबलाय, विहिरींनी गाठला तळ गाठलंय. त्यामुळे नाशिकच्या ग्रामीण भागात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालीय. नाशिक जिल्ह्याच्या पूर्व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली..महागडी बियाणे, खते, औषध फवारणी करून आतापर्यंत ही पिके जगवली..मात्र गेल्या अडीच महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे नाशिकच्या ग्रामीण भागातील मका, कापूस, सोयाबीन, मूग , बाजरी तूर शेतपिकं पाण्याअभावी पूर्णपणे करपू लागली आहेत..सद्यस्थितीत पिकांना पावसाची अत्यंत गरज असतांना पावसाने हुलकावणी दिल्याने जोमात आलेली पिके आता माना टाकू लागली आहे.. यामुळे खरिपाचा पूर्ण हंगाम हा वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.  तसंच ग्रामीण भागासह शहरी भागातील विहिरींनी तळ गाठलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola