Sharad Pawar Yeola Sabha : शरद पवारांच्या सभेतील महत्त्वाचे मुद्दे काय सांगतात? जाणून घ्या
१९९१ मध्ये भुजबळांनी मनगटावरुन शिवसेनेचं शिवबंधन सोडलं आणि शरद पवारांच्या सोबतीला गेले. तेव्हापासून आजतागायत, म्हणजेत तब्बल तीन दशकं भुजबळ हे शरद पवारांची सावली म्हणून, राजकारणात वावरत राहिले. आता मात्र चित्र बदललंय. आता याच दोन्ही नेत्यांमधून विस्तवही जात नाही... आणि त्याचा आगडोंब आज येवल्यात उसळला... पाहूयात, सुमारे ३२ वर्ष एकमेकांच्या खांद्याला खांदे लावणारे हे दोन नेते आता एकमेकांविरोधात शड्डू कसे ठोकतायत....