Radhakrushna Vikhe Patil : Balasaheb Thorat भाजपमध्ये आले तर मी अडवणार नाही- विखे

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी मतदान केल्याने सत्यजीत तांबेंचा विजय झाला असा खुलासा भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय... तांबेंनी फडणवीसांचे आभार मानले त्यातच निवडणुकीतील विजयाचं उत्तर दडलंय असं ते म्हणालेत...भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांवर जोरदार टोेलेबाजी केलीये.. मी भाजपात गेलो तेव्हा पावनखिंड मी एकटा लढवणार असं थोरात म्हणाले होते.. मात्र आता थोरातांनी खिंड सोडून पळ काढला असून आता ते कोणत्या दिशेला पळणार ते त्यांनाच विचारा असा टोला त्यांनी लगावलाय... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola