नाशिकमध्ये हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना हॉटेलमध्ये डांबलं, फोननंतर विद्यार्थ्यांची सुटका
हॉटेल मॅनेजमेंट च्या विद्यार्थ्यांना एका हॉटेलमध्ये डांबून ठेवल्याची घटना नाशिक मध्ये उघडकीस आलीय. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी विद्यार्थ्यांनी दूरध्वनी द्वारे संपर्क साधला त्यानंतर सामजिक कार्यकर्ते आणि पोलिसांनी या विद्यार्थ्यांची सुटका केली, हॉटेल मॅनेजमेंट च्या विद्यार्थी कडून जादा काम करून घेतले जात असल्याची या विद्यार्थ्यांची तक्रार पोलिसांनी विद्यार्थ्यांची सुटका तर केली मात्र हॉटेल व्यवस्थापनावर कारवाई केली नसल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.