Gold rate rise | कोरोनामुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ, प्रतितोळा 44 हजार 380 | ABP Majha
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका सराफा बाजारावर बघायला मिळतोय, सोन्याचे भाव रोज नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. नाशिकमध्ये सोन्याचे दर 44 हजार 380 वर पोहोचले आहेत. ऐन लग्नसराईच्या तोंडावर सोन्याचे भाव वाढत असल्याने ग्राहकांची चांगलीच पंचायत होतेय. जिथे दोन तोळे सोन खरेदी करायचे तिथं मनाला मुरड घालत एक तोळा घेत समाधान मानावे लागत आहे. वाढलेल्या दरामुळं सोनं खरेदीकरणाऱ्या ग्राहकांच बजेट कोलमडून जातंय.