Girish Mahajan : नंदुरबार ते मुंबई निघालेल्या पायी बिऱ्हाड महामोर्चाला नाशिकमध्ये रोखण्यात यश

Continues below advertisement

Girish Mahajan : नंदुरबार ते मुंबई निघालेल्या पायी बिऱ्हाड महामोर्चाला नाशिकमध्ये रोखण्यात यश भाजपचे संकटमोचक अशी ओळख असलेल्या गिरीश महाजनांची शिष्टाई कामास आली आहे. सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांच्या वतीने ७ डिसेंबर २०२३ पासून नंदुरबार ते मुंबई निघालेल्या पायी बिऱ्हाड महामोर्चाला नाशिकमध्ये रोखण्यात त्यांना यश आलं आहे. नाशिकच्या आडगाव परिसरात रविवारी रात्री ११ वाजता गिरीश महाजन मोर्चेकऱ्यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते. जवळपास तासभर मोर्चेकऱ्यांच्या मागण्या समजून घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आता थांबावे अशी विनंती महाजनांनी केली. त्यानंतर सत्यशोधक शेतकरी सभेच्या किशोर ढमाळे यांनी सोमवारी अधिकाऱ्यांसोबत आम्ही चर्चा करु आणि दुपारी नाशिकमध्ये गोल्फ क्लफ मैदानावर समारोप करु असं आश्वासन दिलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram