Nashik Gas Cylinder Blast | नाशिकमध्ये गॅस गळतीमुळे घरात स्फोट; एकाच कुटुंबातील 4 जण जखमी
मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण घर उद्ध्वस्त होऊन कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. हा स्फोट एवढा शक्तिशाली होता की घराची भिंत कोसळली. शिवाय घरापासून 10 ते 15 फूट अंतरावर असलेल्या वाहनाच्या काचाही फुटल्या.
नाशिकच्या खुटवडनगर परिसरात आज सकाळी साडेसातच्या सुमारास पगार कुटुंबाच्या घरात ही घटना घडली. या स्फोटात कुटुंबातील चार जण जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. स्फोट एवढा भीषण होता की घराचं संपूर्ण नुकसान तर झालंच आहे, पण तडे जाऊन घराची भिंतही कोसळली आहे. तसंच घरापासून 10 ते 15 फूट अंतरावर उभ्या असणाऱ्या वाहनांच्या काचा फुटून मोठं नुकसान झालं आहे.