Nashik Gang Rape | चाकूचा धाक दाखवत 13 वर्षांच्या मुलीवर सामुहिक बलात्कार
नाशिक : महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत. देशात सध्या उत्तर प्रदेशातील बदायूं बलात्कार प्रकरण चर्चेत आहे. अशातच नाशिकमधील एक धक्कादायक प्रकरण समोर येत आहे. नाशिक जिल्ह्यात 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. चाकूचा धाक दाखवत मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणातील आरोपींमध्ये एका मुलीचाही समावेश आहे. तसेच बलात्कार करणाऱ्या आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. घडलेल्या घटनेमुळे नाशिक शहरात खळबळ उडाली आहे.