Nashik Bus Fire : नाशिक बस अपघातातील चार मृतांची ओळख पटली, अग्नितांडवात 12 प्रवाशांचा मृत्यू
abp majha web team
Updated at:
08 Oct 2022 07:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक बस अपघातातील चार मृतांची ओळख पटली आहे. नाशिकमध्ये बसला अपघात होऊन झालेल्या अग्नितांडवात 12 प्रवाशांचा मृत्यू झालाय, तर ३२ प्रवासी जखमी झालेत. आज पहाटे ही घटना घडलीय. यवतमाळकडून मुंबईकडे येणारी बस आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास नाशिकमध्ये एका ट्रकला धडकली आणि ट्रकच्या इंधन टाकीत गळती होऊन स्फोट झाला. त्यानंतर बसने पेट घेतला. संपूर्ण बस जळत असताना प्रवासी खिडकीतून बाहेर येण्यासाठी धडपडत होते. त्यात काही जण यशस्वी झाले, तर अनेक जण होरपळले.