NASHIK FIRE : नाशिकच्या चांदवडमध्ये कोविड सेंटर असलेल्या इमारतीत आग, फर्निचरच्या दुकानाने घेतला पेट
चांदवड शहराताल मुंबई-आग्रा महामार्गावरील शनी मंदीरा जवळ नव्याने सुरु होत असलेल्या खाजगी कोविड सेंटरच्या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या लाकडी फर्निचरच्या दुकानाला आग लागल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. आग लागताच कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या 14 ते 15 रुग्णांना तातडीने तेथून बाहेर सुखरुप पणे काढण्यात आले. या सर्व रुग्णांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.