Nashik Fire: नाशिकमधील इगतपुरीमधील जिंदाल कंपनीला आग, अनेक कामगार अडकल्याची भीती

Nashik Fire:  नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील कंपनीला भीषण (Nashik Fire) आग लागली आहे. ही आग प्रचंड असून परिसरात धुराचे लोट उसळले आहेत. जिंदाल पॉलिफिल्म्स (Jindal Polyfilms) या कंपनीला आग लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीत काही कामगार जखमी झाल्याचे वृत्त आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola