Lockdown 4.0 | नाशिक पोलिसांच्या नावे बनावट ईपासची विक्री; 31 वर्षीय तरुणाला बेड्या
नाशिक पोलिसांच्या नावे बनावट ईपास तयार करुन त्याची विक्री होत असल्य़ाचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आलाय...याप्रकरणी योगेश कोदे या 31 वर्षीय तरुणाला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर तात्काळ ईपास तयार करुन मिळेल अशा आशयाची पोस्ट व्हायरल केली होती. एका महिलेने संपर्क साधला असता आरोपीने महिलेला ईपास तयार करुन दिला. मात्र, हा प्रकार संशयास्पद वाटल्याने महिलेने अंबड पोलिसांकडे धाव घेतली. आरोपीने अनेकांना बनावट पास देऊन पैसे उकळल्याचा पोलिसांना संशय आहे...