Sudhakar Badgujar in BJP : सुधाकर बडगुजर आज भाजपात करणार प्रवेश, आज मुंबईत होणार कार्यक्रम

Continues below advertisement

Sudhakar Badgujar in BJP: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर 'मनपरिवर्तन' होऊन ठाकरे गटात नाराज असल्याचा प्रबळ आंतरिक जाणीव झालेले सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) हे मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईच्या नरिमन पॉईंट येथील भाजप (BJP) मुख्यालयात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यासाठी सुधाकर बडगुजर मंगळवारी सकाळी आपल्या हजारो कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र, आता त्यांच्या गाड्या अर्ध्या रस्त्यात असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी चक्रावून टाकणारे विधान केले आहे.  सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाविषयी माझ्याकडे कोणतीही माहिती नसल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. ते मंगळवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही. जोपर्यंत स्थानिक टीम असते, पदाधिकारी, खासदार आमदार त्यांच्याशी सल्लामसलत एकमत झाल्याशिवाय आमच्याकडे पक्षप्रवेश होत नाही. आमच्याकडे बडगुजरांच्या पक्षप्रवेशाला स्थानिक पदाधिकऱ्यांचा विरोध आहे. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही. नाशिकचे स्थानिक पदाधिकाऱ्यांचा या पक्षप्रवेशाला विरोध आहे. निवडणुकीच्या राजकारणात जेव्हा आपण एकमेकांच्या विरोधात लढतो आणि आता निवडणुकीला फक्त सहा महिने झाले आहे. त्यामुळे विरोधाची भावना असते. परिणामी नाशिकमध्ये बडगुजर यांच्याविषयी विरोधाची भावना आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले. बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे आज सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश होणार की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मोठ्या शक्तीप्रदर्शनाची तयारी करुन मुंबईला निघालेल्या सुधाकर बडगुजर यांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश होऊ शकला नाही तर त्यांच्यासाठी ती मोठी नामुष्की ठरेल.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola