नाशिकमध्ये खणाच्या कापडाचे आकाशकंदील! अमेरिका, कॅनडा, दुबई, इंग्लंडहून कंदिलांना मोठी मागणी
दिवाळीचा सण आता अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपला असून त्यानिमिताने बाजारपेठा विविध साहित्यांनी सजून गेल्या आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदाही आकाशकंदीलाचे अनेक प्रकार बाजारात बघायला मिळत असून नाशिकमध्ये सोशल मीडियात मात्र सध्या खणाच्या कापडापासून बनवलेल्या आकाशकंदिलांची चांगलीच चर्चा रंगलेली बघायला मिळतीय. चायनीज मालाला फाटा देत नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील अपूर्वा, श्वेता आणि सविता या तिन बहिणी खणाच्या कापडापासून सुंदर आणि आकर्षक असे आकाशकंदील तयार करतायत.
Tags :
Diwali Kandil Diwali Lantern Diwali Shopping Diwali Market Shopping Diwali Festival Diwali Celebration Pune Diwali Diwali 2020