Diwali 2022 Nashik मध्ये आनंदाची शिधा सर्वांना कधी मिळणार? किटच्या पिशव्याअभावी वितरण रखडलं

दिवाळीसाठी (Diwali 2022)  शिंदे-फडणवीस सरकारनं जाहीर केलेला आनंदाचा शिधा (Anandacha Shidha)  आजपासून लोकांपर्यंत पोहोचेल असं आश्वासन अन्न व नागरीपुरवठा मंत्र्यांनी दिलं. मात्र राज्यभरातल्या अनेक रेशन दुकानांवर या किटचा पत्ताच नाहीय काही ठिकाणी सगळ्या वस्तू पोहोचल्या नसल्यानं तर काही ठिकाणी किटच्या पिशव्या मिळाल्या नसल्यानं वितरण रखडलंय. दिवाळीसाठी रेशनिंग दुकानातून 100 रुपयांत रवा, साखर, गोडेतेल, चणाडाळ या वस्तू आनंदाचा शिधा म्हणून देण्याची घोषणा सरकारनं केली. या वस्तू पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे फोटो असलेल्या पिशवीतून देण्यात येणार आहेत.   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola