Police Dance : पोलिसांच्या हिरोगिरीला वेसण, सोशल मीडियावर चमकोगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तंबी

Continues below advertisement

राज्यातील पोलिसांच्या हिरोगिरीला वेसण घालणारे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिलेत. पोलिसांना गणवेश परिधान करून मिरवणुकीत वाद्य वाजवणं आणि नाचण्यास मनाई करण्यात आलीय. तसंच सोशल मीडियावर व्हीडिओ शेअर करणं आणि फेसबुकवर रिल्स बनवणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही तंबी देण्यात आलीय. शिस्तबद्ध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलीस खात्याची कर्मचाऱ्यांच्या वर्तनामुळे प्रतिमा मलिन होऊ नये याची खबरदारी घेण्याचे आदेश विशेष महानिरीक्षकांनी काढलेल्या परिपत्रकात देण्यात आलेत. गणेश मिरवणुकीत पोलीस नृत्य करतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांच्या वर्तणुकीबाबत अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram