New Year Celebration :Nashik :नववर्षाचं स्वागतासाठी नाशिकमध्ये काळाराम मंदिरात भाविकांनी घेतलं दर्शन
प्रभू श्रीरामाच्या दर्शनाने नववर्षाचं स्वागत करण्यासाठी नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी रांगा लावल्या आहेत.. सलगच्या सुट्ट्यांमुळे परराज्यातील भाविक देखिल मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. रामनामाच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला असून रामाचं मनोभावे दर्शन घेत निरोगी आयुष्यासाठी भाविकांकडून प्रार्थना केली जातेय. भाविकांची गर्दी लक्षात घेता रात्री एक पर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे.