Nashik : नाशकात महानुभाव पंथाचं संमेलन, Devendra Fadnavis - Eknath Khadse एकाच मंचावर
महानुभव पंथांचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांच्या अष्टशताब्दी जन्मोत्सव निमित्त नाशिक मध्ये तीन दिवसांचा महानुभव संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.. नाशिकच्या डोंगरे मैदनावर आयोजीत या समलेनाचे सोमवारी ध्वजारोहण झाल्यानंतर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. महानुभाव पंथाचा प्रचार प्रसार व्हावा, परिसंवाद घडावेत ही संमेलन मागची भूमिका आहे. संमेलनात काही मागण्या आणि ठराव मांडले जाणार आहेत.
पांडुरंगाच्या पूजेला मुख्यमंत्री जतात तसेच चक्रधर स्वामींच्या पूजेला मुख्यमंत्रीनी जावे, गुजरात मधील भरवस येथील चक्रधर स्वामींची जन्मभूमी महानुभाव अनुयायाच्या दर्शनासाठी खुली करावी, चक्रधर स्वामींच्या जन्मदिनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, स्वामींचा पदस्पर्श झालेली ठिकाणांची शासन दरबारी नोंद करून घ्यावी, महानुभाव संप्रदायी संत भाविकांसाठी प्रत्येक गावात दफनविधीसाठी जागा मिळावी, श्री क्षेत्र वृद्धिपुर येथे मराठी भाषेच्या विकासासाठी मराठी भाषा विद्यापीठ मान्यता मिळावी इत्यादी मागण्या मांडल्या जाणार आहेत, शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहण्याची शक्यता आहे