Nashik Nivruttinath Palkhi : त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
Continues below advertisement
आता सर्वांना वेध लागलेत ते आषाढी एकादशीचे आणि विठूरायाच्या दर्शनाचे. पालखी सोहळ्यांना सुरुवात झालीय आणि आज हरिनामाचा जयघोष करत त्र्यंबकेश्वरहून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थान केलंय. आणि हजारो वारकरी पालखीसोबत निघाले आहेत. यंदा जवळपास 45 पालख्या विविध ठिकाणांहून दिंडीत सहभागी झाल्यात. वारकऱ्यांसाठी 12 फिरते शौचालय आणि पिण्याच्या पाण्याचे पाच टँकर प्रशासनाकडून पहिल्यांदाच उपलब्ध करून देण्यात आलेत. वारकऱ्यांच्या सोयीसाठी यंदा इतिहासात पहिल्यांदाच एक दिवस आधी पालखी रवाना झालीय. दरवर्षी चतुर्दशीच्या दिवशी होणारे प्रस्थान यंदा त्रयोदशीला करण्यात आलंय. निवृत्तीनाथांच्या पालखीचा महिला मुक्काम त्यांचे गुरू गहिनीनाथ महाराजांच्या समाधीस्थळी असणार आहे.
Continues below advertisement
Tags :
Darshan Trimbakeshwar Dindi Ashadhi Ekadashi Participants Vithurai Palkhi Celebrations Begin Santshrestha Nivrittinath Maharaj Thousands Of Varkaris Leave With Palkhi Tanker Administration Guru Gahininath Maharaj