Corona Vaccination : नाशिकमध्ये आज पुरेल इतक्याच लसींचा साठा
Continues below advertisement
कोरोना संकटामध्ये आता प्रशासनापुढं उभी राहिलेली नवी अडचण म्हणजे लसींचा तुटवडा. देशातील बहुतांश राज्यांसोबतच महाराष्ट्रातही हीच परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे. मुंबई, पुण्यासह नाशिकमध्येही लसींचा तुटवडा जाणवू लागला आहे. सध्याच्या घडीला नाशिकमध्ये आजच्या दिवसापुरताच लसींचा साठा उपलब्ध आहे.
Continues below advertisement