Eknath Shinde Nashik : मुख्यमंत्री नाशिकमध्ये शेतकऱ्याच्या बांधावर, नुकसानीवरील उपाययोजनांबाबत चर्चा
Continues below advertisement
अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नाशिक जिल्ह्यात थैमान घातलंय.. शेतात काढून ठेवलेला कांदा पाण्यात भिजल्याने सडतोय.. त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय..अयोध्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले. सटाण्यातील निताने ,बिजोटे आणि आखातवाडे इथे त्यांनी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. बागलाण तालुक्यात अवकाळीग्रस्त भागाचीही त्यांनी पाहणी केली. याच विषयावर मुंबईत झालेल्या बैठकीत अवकाळी पाऊस आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीवरील उपाययोजनांबाबत चर्चाही झाली.
Continues below advertisement
Tags :
Ayodhya Onion Farmers Chief Minister Unseasonal Rain Hail | Nashik 'Eknath Shinde Nitane Bijote Akhatwade