Yeola Dongargaon : मांजरपाडा प्रकल्पातील पाणी येवला तालुक्यात; Chhagan Bhujbal यांच्या हस्ते जलपूजन

Continues below advertisement

छगन भुजबळांच्या हस्ते डोंगरगावमध्ये जलपूजन, मांजरपाडा प्रकल्पातील पाणी पुणेगाव दरसवाडी कालव्यातून येवला तालुक्यात पोहोचलं, भुजबळांना जलनायक ही नवी उपाधी. 

मांजरपाडाचे पाणी येवला तालुक्यात आल्यानंतर 55 वर्षांपूर्वी बघितलेलं स्वप्न आज पूर्ण झालं आहे, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात पाणी आल्यानं आज भुजबळ यांच्या हस्ते कुटुंबीयांचा उपस्थित जलपूजन करण्यात आले, यावेळी भुजबळ भावुक झाले होते, भुजबळ यांच्याशी संवाद साधण्याची प्रयत्न केल्यावर भुजबळ हात जोडून काही क्षण उभे राहिले, निःशद्ब आहे, काय बोलणार शब्दच नाहीत अशी प्रतिक्रिया त्यांनी एबीपी माझाला दिली. संघर्ष खूप मोठा होता आज पाणी आल्याने त्याचा आनंद आहे, हे सर्वांना पाणी मिळणार इथे जमलेले कोणी राजकारणी नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.  जलपूजनसाठी येताना ठिक ठिकाणी भुजबळ यांचे ग्रामस्थांच्या वतीने उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. जलनायक ही उपाधी त्यांना देण्यात आली  जनतेचे प्रेम असल्याने ते असे बोलतात अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली त्यांच्याशी संवाद साधलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram