Chhagan Bhujbal News : छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडणार? बारामती ते नाशिक जोरदार बॅनरबाजी #abpमाझा

Continues below advertisement

Chhagan Bhujbal News : छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडणार? बारामती ते नाशिक जोरदार बॅनरबाजी #abpमाझा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मंत्रिमंडळ विस्तारात 9 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज होत नागपूर सोडून नाशिकला निघून गेले.  छगन भुजबळ यांनी अधिवेशनाला जाणार नसल्याचं म्हटलं. पक्षाकडून देण्यात आलेली राज्यसभेची ऑफर देखील छगन भुजबळ यांनी धुडकावली असल्याचा पाहायला मिळालं. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार गेल्या  24 तासांपासून कुणालाच भेटले नसल्याची माहिती आहे. अजित पवार काल अधिवेशनाला देखील हजर नव्हते. ते आज अधिवेशनाला हजर राहणार की नाही याकडे देखील लक्ष लागलं आहे.

अजित पवार नागपूरमध्येच पण भेटी टाळल्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार काल विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हजर राहिले नव्हते.  त्यामुळं अजित पवार कुठं आहेत याबाबत प्रश्न विचारला जात आहे. अजित पवार नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री यांचं निवासस्थान असलेल्या विजयगडमध्ये असल्याची माहिती आहे. कार्यकर्ते अजित पवारांना भेटण्यासाठी आलेले आहेत. मात्र, ते कुणाला भेटले नसल्याची माहिती आहे. काल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधिमंडळात आले होते. काल अजित पवार अधिवेशनाला गैरहजर होते. ते गेल्या 24 तासांपासून कुणालाच भेटले नसल्यानं अजित पवार यांचं मौन चर्चेत आहे.  अजित पवार  नागपूरमध्ये नसल्याचं सांगितलं जातंय. आज विधिमंडळ अधिवेशनाला अजित पवार हजर राहणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram