Nashik : छगन भुजबळ आणि शिवसेना नेते सुहास कांदे यांच्यातील वाद चिघळला, कांदे यांचा आत्मदहनाचा इशारा
नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे स्थानिक आमदार सुहास कांदे यांच्यातील वाद काही शमन्याचं नाव घेत नाहिए. उलट दिवसेंदिवस हा वाद आणखीनच चिघळत चालला असून सुहास कांदे यांनी आत्मदहनाचा इशारा देत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना पत्र पाठवलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडेही त्यांनी तक्रार केली आहे आणि जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मागील मंजूर कामाच्या निधीचं वाटप होऊ नये अशी मागणी सुध्दा केली आहे.
Tags :
Nashik Chhagan Bhujbal Suraj Mandhare Suhas Kande Chhagan Bhujbal And Suhas Kande Nashik Politics