Chandrashekhar Bawankule : नाशिकच्या जागेबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री शिंदेच घेतील -बावनकुळे
Continues below advertisement
Chandrashekhar Bawankule : नाशिकच्या जागेबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री शिंदेच घेतील -बावनकुळे महायुतीतील नाशिकचा तिढा जवळपास सुटला आहे असंच म्हणावं लागेल. कारण नाशिकचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असं महत्त्वाचं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. नाशिकमध्ये त्यांनी छगन भुजबळांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी नाराज होणं सहाजिक आहे, भुजबळ खूप मोठे नेते आहेत, पण या निवडणुकीत सगळे जण मोदींना जिंकवण्यासाठी काम करत आहेत आणि पुढेही करतील असा विश्वास देखील बावनकुळे यांनी व्यक्त केला.
Continues below advertisement