Chaitram Pawar : वन्यजीव, पर्यावरण क्षेत्रात ल्लेखनिय कार्य, चैत्राम पवार यांना Padma Shri पुरस्कार

Padma Awards 2025 : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे.  सरकारने आरोग्य, खेळ, कला, साहित्य तसेच इतर क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सन्मान केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येच्या भाषणानंतर या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील काही बड्या चेहऱ्यांचाही समावेश आहे. 

महाराष्ट्रातून कोणाकोणाला पद्म पुरस्कार जाहीर?

केंद्र सरकारने महाराष्ट्रासह देशाच्या इतरही भागातील वेगवेगळ्या क्षेत्रात अनोखे काम करणाऱ्यांच्या नवांची पद्म पुरस्कारासाठी निवड केली आहे. त्या नावांची आज घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रात काम करणाऱ्या मारुती चितमपल्ली यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. चैत्राम पवार यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola