Bhau Chaudhari join Eknath Shinde Camp : ठाकरेंचा 'भाऊ' शिंदे गटात, नागपुरात केला प्रवेश

खासदार संजय राऊत यांना मोठा दणका बसलाय. संजय राऊत यांचे अत्यंत जवळचे असलेले आणि नाशिकचे संपर्कप्रमुख भाऊ चौधरी यांनी ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र केलाय. नागपुरात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केलाय. नाशिकमध्ये अनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाला मोठं भगदाड पाडलेलं असताना आता भाऊ चौधरींच्या भूमिकेनं ठाकरेंना मोठा धक्का बसलाय. संजय राऊत यांनी पडझड थांबवण्यासाठी नाशिकचे दौरेही केलेत. मात्र, त्यानंतरही ठाकरे गटाला लागलेली गळती थांबायचं नाव घेत नाहीय. दरम्यान, बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी वरिष्ठांबाबत नाराजीचा सूर आळवलाय. पाहूयात काय म्हणालेत भाऊ चौधरी...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola